पुणे महाराष्ट्र

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साताऱ्याच्या गडानंतर सोलापूरचा बुरूज ढासळणार??

सोलापूर |  पश्चिम महाराष्ट्र हा विभाग आत्तापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जायचा. किंबहुना पश्चिम महाराष्ट्राने आघाडीला अनेकदा घवघवीत यश दिलं. मात्र गेल्या विधानसभा आणि झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने याच गडाला सुरूंग लावला. आज साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजेंनी पवारांची साथ सोडली त्यात सोलापूरचे काही काँग्रेस नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं कळतंय.

सोलापूरच्या अक्कलकोटचे काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रे भाजपच्या वाटेवर आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची म्हेत्रे यांनी भेट घेतली आहे. म्हेत्रे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना याबाबतची पूर्वकल्पणा दिली आहे, अशी माहिती कळतीये. म्हेत्रे यांच्याबरोबर सोलापूर काँग्रेसचे अनेक आजी माजी पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार असल्याचीही माहिती मिळतीये.

आमदार सिद्धराम म्हेत्रे हे सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. म्हेत्रे यांनी जर भाजपात प्रवेश केला तर काँग्रेससाठी तो मोठा धक्का असेल.

लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते पाटलांनी पवारांना झटका देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने माढ्याची जागा गमावली. अन् तिथेच राष्ट्रवादीच्या गडाला सुरूंग लागला.

दुसरीकडे सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी निवडणूक न लढण्याची घोषणा केलीये. त्यामुळे आघाडीच्या ताब्यातील जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा सेना-भाजपने चंग बांधलाय.

दरम्यान, काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणारा पश्चिम महाराष्ट्र यंदाच्या विधानसभेला आघाडीला ‘टायमिंग’ साधून ‘हात’ देणार की आघाडीला ‘बाण’ मारून ‘कमळ’ फुलवणार हे येत्या दिवसांत स्पष्ट होईल.

महत्वाच्या बातम्या-

-अन् मुस्लिम महिलांना न्याय देणारं ‘तीन तलाक’ विधेयक राज्यसभेत मंजूर!

-छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार??? उद्धव ठाकरे म्हणतात…

-इस्रोच्या एकावर एक यशस्वी मोहिमा अन् केंद्र सरकार करतंय शास्त्रज्ञांच्या पगारात कपात!

-धनगर समाजासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा!

-राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पिचडांना मतदारसंघातील लोकांकडून धक्का!

IMPIMP