महाराष्ट्र मुंबई

नितेश राणेंच्या पाठीवर राष्ट्रवादी आणि मनसेचा ‘हात’; 16 जुलैला करणार जेलभरो आंदोलन

मुंबई |  नारायण राणेंचे पुत्र आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी बांधकाम उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर काम न केल्याचा आरोप करत चिखलफेक करून धक्काबुक्की केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. न्यायालयाने देखील त्यांना दणका दिला आणि यानंतर त्यांना जेलची हवा खावी लागली.

याप्रकरणी आता चांगलंच राजकारण तापू लागलं आहे. नितेश राणे कसे चुकीचे आहेत हे अनेक जणांनी सांगितलं तर नितेश राणेंनी केलं ते योग्यच केलं. अधिकाऱ्यांना हीच भाषा समजते, अश्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. विविध राजकीय पक्षात देखील असेच गट पडू लागले आहेत. नितेश राणे यांना राष्ट्रवादी आणि मनसेने पाठिंबा दिला आहे. नितेश राणे यांच्या समर्थनार्थ मनसे आणि राष्ट्रवादी 16 जुलै रोजी जेलभरो आंदोलन करणार आहेत. ही भूमिका घेऊन राष्ट्रवादी आणि मनसेने भाजपला शह दिल्याचं बोललं जात आहे.

प्रथमत: महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिडित प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन राज्य सरकार खंबीरपणे आपल्या पाठिशी उभा आहे, असं सांगून राणेंना दणका दिला. पाटलांनी शेडेकर कुटुंबियांची भेट घेतली तेव्हा राणेंवर खुनाच्या प्रयत्नाचं कलम लावण्याचे आदेश आपण एसपींना दिल्याचं सांगितलं होतं. या प्रकरणाचा व्हीडिओही समोर आला होता. मात्र पाटलांनी युटर्न घेत असं मी म्हणालोच नव्हतो, असं घुमजाव केलं.

दरम्यान, न्यायालयाने 9 जुलैपर्यंत नितेश राणे यांना पोलिस कोठडी सुनावली होती. आज त्यांना सुनावणीसाठी न्यायालयात आणलं आहे. न्यायालय त्यांना जामीन देतं का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

IMPIMP