सांगली | पावसात भिजून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त 54 आमदार निवडून आले. तुम्ही पक्षाची स्थापना केल्यापासून पक्षाचा नेता मुख्यमंत्री करता आला नाही, अशी टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर केली होती.
गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांवर गोपीचंद पडळकर यांनी टीका केल्यानंतर मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पडळकरांना प्रत्युत्तर दिलंय.
साताऱ्यातील पावसाळी सभेत शरद पवारांनी आव्हान केलं आणि त्याला महाराष्ट्रातल्या तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे गोपीचंद पडळकर विसरले असावेत, असंही ते म्हणाले.
शरद पवार हे साताऱ्यातील प्रचारसभेत पावसात भिजले आणि निमोनिया भाजपला झाला असा, टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, वीस वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही त्यांनी भाजपाची चिंता करू नये, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला होता.
राज्यात 2024 च्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ, असा दावा करणाऱ्या भाजपाला महाविकास आघाडीचे निर्माते शरद पवार यांनी जशास तसे उत्तर देताना राज्यात भाजपला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असं आव्हान दिलं होतं.
जनता भाजपासोबत असल्यामुळे तुम्ही किती जरी संघर्ष केला, आम्ही काहीतरी मोठे आहोत असं वातावरण तयार केलं तरी 2029 ला साताऱ्यात पावसात भिजून सुद्धा तुम्हाला 54 च्या वर जाता आलं नाही, अशी टीका त्यांनी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोनाच्या चौथ्यालाटेबाबत डॉ. अविनाश भोंडवेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती
“हिंमत असेल तर काढा दोन्ही कुबड्या आणि लढा स्वबळावर”
“संजय राऊतांचं असं आहे की दिन में बोले जय श्री राम, रात को लेते…”
मोठी बातमी! युद्ध संपवण्यासाठी पुतिन यांनी केल्या ‘या’ मागण्या
“तीन नापास विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखं वागतायेत”