राष्ट्रवादीला मोठा धक्का! महाराष्ट्राच्या ‘या’ लोकप्रिय आमदाराचं नि.धन

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मोठी शोककळा पसरली आहे. कारण राज्यात सर्वाधिक लोकप्रिय मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री निध.न झाले आहे.

भारत भालके हे 60 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृत्ती चिंताजनक होती. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृ.त्यू झाला आहे. आज पंढरपूरच्या सरकोली येथे त्यांच्यावर अं.त्यसंस्कार  करण्यात येतील. भारत भालके यांच्या नि.धनाने महाराष्ट्राच्या राजकारणावर शोककळा पसरली आहे.

शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि जवळचे आमदार म्हणून भारत भालके यांची गणना होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

भारत भालके यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याची शंका आल्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली होती. 30 ऑक्टोबर रोजी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र, त्यानंतर पाचच दिवसांनी म्हणजेच 4 नोव्हेंबर रोजी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते घरी सुद्धा आले होते. मात्र काही दिवसांनी पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्यांना मागील आठवड्यात पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना गुरुवारपासून त्यांची तब्येत अचानक खालावली. त्यांना किडनीचा आजार आणि मधुमेहाचा त्रास देखील होता.

दरम्यान, भारत भालके हे फक्त पंढपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हॅट्रिक आमदार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी सलग तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकलेली आहे. नुकतीच 2019 मध्ये पार पडलेली विधानसभेची निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीकडून लढवली आणि जिंकली देखील होती.

भारत भालके यांनी 2009 मध्य कमाल केली होती. पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला होता.

2019 साली देखील त्यांना तगडं आव्हान होतं. माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता. 2002 पासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून ते आज तागायत काम पाहत होते. जनसामान्यांचा नेता म्हणून त्यांना ओळखलं जात होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

अर्णव गोस्वामिंच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाची मोठी सुनावणी

‘माझ्यावर वि.षप्रयोग करणारी ती…’; लता मंगेशकर यांचा धक्कादायक आरोप!

अबब!!! सोन्याचे भाव तब्बल 8 हजार रुपयांनी कोसळले; पाहा आजचे सोन्याचे दर

राष्ट्रवादीकडून ‘या’ बड्या नेत्याची पक्षातून हाकलपट्टी अन् शिवसेनेला मोठा दिलासा!

शरद पवार रुग्णालयात दाखल; राष्ट्रवादीच्या लोकप्रिय नेत्याची तब्येत चिंताजनक