परभणी : पुरंदरच्या किल्ल्यावर मिर्झाराजे जयसिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी वाटाघाटी केल्या. दिल्लीला गेल्यानंतर मात्र या रयतेच्या राजाला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यानंतर छत्रपती परतले आणि पुरंदरच्या तहात गेलेले किल्ले त्यांनी परत मिळवले. पुन्हा रयतेचे राज्य स्थापन केले. याउलट त्यांच्याच कुटुंबातली माणसे दिल्लीत जाऊन गमछा घालून घेण्यात धन्यता मानतात, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता उदयनराजे भोसले यांच्यावर केली.
परभणीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी शरद पवार यांनी संवाद साधला. यावेळी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. तसेच पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचाही जोरदार समाचार घेतला.
नाशिक ही कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. मात्र पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर बाजारात कोणी कांदा आणायचा नाही, असं सांगण्यात आलं. काही कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या, अटक केली. पाकिस्तानातून कांदा आयात केल्याने इथल्या किमती पडल्या, त्यामुळे शेतकरी गाडीवर कांदे फेकतील याची भीती सरकारला होती, असं शरद पवार म्हणाले आहेत.
आपल्या विरोधात प्रतिक्रिया आली तर कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्याचे काम हे सरकार करते. ज्याच्या मनगटात धमक आहे आणि स्वाभिमान शिल्लक आहे, असा कोणताही माणूस हे सहन करणार नाही, असंही पवार या वेळी म्हणाले.
बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत आणि नोकरभरतीची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी वेगळीच भरती सुरू केली, पण काही माणसे गेली तरी त्याची मला चिंता नाही. 1980 साली 52 आमदार मला सोडून गेले, पण पुढच्या निवडणुकीत त्यातला एकही निवडून आला नाही, असं पवारांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
“पाच वर्षांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेली 15 कामे दाखवा” – https://t.co/sSRpYaOGUI @ShivsenaComms @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 20, 2019
सुनिल गावसकर यांचं धोनीबाबत खळबळजनक वक्तव्य!- https://t.co/MDr6s1UrSL #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 20, 2019
ज्यांनी ज्यांनी राष्ट्रवादी सोडली त्यातले एकपण आमदार होणार नाहीत; शरद पवारांचा दावा – https://t.co/tBEaGhiLfm @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 20, 2019