पुणे | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाचं सूत्र ठरलंय, मात्र काही जागांसाठी अजूनही रस्सीखेच सुरु आहे. पुण्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाची जागा ही त्यापैकीच एक.
ही जागा आपल्याला मिळावी, अशी दोन्ही पक्षांची मागणी आहे. मात्र राष्ट्रवादीने ही जागा मागताना काँग्रेस याठिकाणी गेली 52 वर्षे जिंकलेली नाही हा सर्वात मोठा मुद्दा पुढे केला आहे.
माजी आयएएस अधिकारी संभाजी झेंडे या ठिकाणावरुन राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी यासंदर्भात पक्षाकडे तिकिटाची मागणी देखील केली आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना तयारी करण्यास सांगण्यात आल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून कळतंय.
दरम्यान, या जागेची मागणी करताना राष्ट्रवादीने आणखी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. ज्यामध्ये काँग्रेसचे प्रस्तावित उमेदवार संजय जगताप याठिकाणाहून तीनवेळा पराभूत झालेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक मतदान झालंय, आदी मुद्द्यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
सुभाष देसाईंना शह देण्यासाठी आघाडीकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी जाहीर??? – https://t.co/7OG1F8vSln #विधानसभा2019
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
विधानसभेला चंद्रकांत पाटील ‘या’ मतदारसंघातून उतरणार निवडणुकीच्या मैदानात??? – https://t.co/WxhoaKDFcP @ChDadaPatil @INCMaharashtra @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
मराठवाड्यात मनसे इतक्या जागांवर विधानसभा लढणार?? – https://t.co/m05nyOfwqi @RajThackeray @INCMaharashtra @NCPspeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019