बापाकडे बघून मुलाला कोणी मुलगी देत नाही; राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई :  केंद्राचा टेंभा मिरवत मते मागण्याचा विचार सोडा. लग्नासाठी मुलीचा हात मागायला मुलगा गेला तर, त्याच्या बापाच्या कर्तृत्वावर कोणी मुलगी देत नाही. त्यासाठी मुलानं कर्तृत्व दाखवण्याची गरज असते, असा टोला राष्ट्रवादीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या निर्णयांमुळं राज्यात कशा प्रकारे गुंतवणूक वाढेल याबद्दलची माहिती दिली. तसंच मोदी आणि सीतारामन यांचे कौतुक केले. यावरूनच राष्ट्रवादीनं फडणवीसांवर तोफ डागली आहे.

राष्ट्रवादीनं फडणवीस आणि अमोल कोल्हे यांचा एकत्रित व्हीडिओ पोस्ट केला आहे. फडणवीस हे पत्रकार परिषदेत केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अमोल कोल्हे हे राज्य सरकारनं केलेल्या विकासकामांबाबत जाब विचारताना या व्हीडिओत दिसत आहेत. याशिवाय राष्ट्रवादीनं ट्विट करत फडणवीसांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करताना थकत नाहीत. केंद्राने काय केलं हे सोडा, राज्यातील जनता तुमची कामगिरी पाहून मतं देणार आहे, असं राष्ट्रवादीनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्राने काय केलं हे सोडा, राज्यातील जनता तुमची कामगिरी पाहून मते देणार आहे, असही राष्ट्रवादीनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-