“संभाजी भिडेंची ISROच्या प्रमुख पदी नियुक्ती करा”

पुणे | अमेरिकेनं एकादशी दिवशी उपग्रह सोडला कारण त्या दिवशी ब्रह्मांडातील स्थिती संतुलित असते. त्यामुळे तो प्रयोग यशस्वी झाला, असं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं होतं. भिडेंच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहीलं आहे.

संभाजी भिडे यांची ISRO च्या प्रमुख पदी नियुक्ती करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे पुणे शहर सरचिटणीस परीक्षित तळोकार यांनी नरेंद्र मोदींकडे केली आहे.

मी परीक्षित तळोकार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पुणे शहर सरचिटणीस पदी काम करतो. या पत्राद्वारे मी सांगलीतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्री. संभाजी भिडे गुरूजी यांची ISRO च्या प्रमुख पदी तात्काळ नियुक्ती करावी यासाठी मी पत्र लिहीत आहे, असं परीक्षित तळोकर यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेनं एकादशीला यान सोडल्याने त्यांचा प्रयोग यशस्वी झाला, असं संभाजी भिडे म्हणाले. असं असल्यास भारताच्या उज्वल भविष्यासाठी संभाजी भिडे यांची नियुक्ती करण्यात यावी, असं परीक्षित तळोकार म्हणाले आहेत.