…म्हणून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरींना मिळाली विधान परिषदेची उमेदवारी!

मुंबई |  भाजप शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी विधानपरिषदेचे आपापले उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यापाठोपाठ राष्ट्रवादीने देखील आपले दोन उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि युवा नेते अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा ट्विटरवरून केली आहे.

ऑक्टो. 2019 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत साताऱ्याच्या कोरोगाव मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांचा अवघ्या 2 हजार मतांनी पराभव झाला. हा पराभव पक्षाच्या खूपच जिव्हारी लागला होता. अनेक नेत्यांनी भाषणात शिंदे यांच्या पराभवाची सल बोलून दाखवली होती. पराभव झाल्यापासून शिंदे यांनी पक्षाच्या कामात स्वत:ला झोकून घेतलं होतं. अगदी दृष्टीक्षेपात असणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी शिंदे यांच्या खांद्यावर टाकली होती. पराभव झाल्यापासून शिंदेंनी खचून न जाता उलट पक्षाच्या कामाला नव्या हिमतीने सुरूवात केली. अढळ पक्षनिष्ठा आणि सत्ता आणि प्रशासनाचा असलेला अनुभव यांच्या जोरावर त्यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेची संधी दिली आहे.

दुसरीकडे अमोल मिटकरी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तो काळ पक्षासाठी अत्यंत खडतर होता. एक-एक दिग्गज नेते पक्षाला रामराम ठोकत होते. मात्र त्यावेळी डॉ. अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी यांनी सभा गाजवत निराशेच्या गर्तेत असलेल्या पक्षाला ‘राष्ट्रवादी पुन्हा’ म्हणत जनसामान्यांपर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहचवली. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून त्यांनी पक्षाच्या इतर नेत्यांसह महाराष्ट्र पिंजून काढला. मिटकरींनी तत्कालिन शिवसेना-भाजपला झोडायला सुरूवात केल्यावर लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत गेला. तसतसे मिटकरी अल्पावधीत लोकप्रिय झाले. तसंच पक्षात देखील त्यांना मानाचं स्थान मिळालं. आपल्या अमोघ वाणीच्या जोरावर आणि सामाजिक, ऐतिहासिक आणि राजकीय अभ्यासाच्या जोरावर त्यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, शशिकांत शिंदे यांना शासन प्रशासनाचा उत्तम अनुभव आहे. तसंच त्यांची भाषण अभ्यायपूर्ण मानली जातात. तर मिटकरींनी आतापर्यंच सभांची मैदाने गाजवली आहे. त्यांच्यापुढे आता अभ्यासपूर्ण भाषणं करून विधानसपरिषदेचं सभागृह गाजवण्याच आव्हान असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-उद्धव ठाकरे अस्वस्थ, त्यांना अशाप्रकारच्या राजकारणात रस नाही- संजय राऊत

-“राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीये, अन् 3 पक्षांचं सरकार कुरघोडीच्या राजकारणात व्यस्त”

-“भारत कोरोना विरोधात लस निर्मितीपासून काही पावलं दूर”

-“महाराष्ट्रात माणसाच्या जिवाचं काहीही मूल्य राहिलं नाही”

-लॉकडाउननंतर एकनाथ खडसे भाजपला धक्का देणार; घेणार मोठा निर्णय?