अतिशहाणपणा केल्यानेच मला कोरोना झाला- जितेंद्र आव्हाड

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोनावर मात केल्यानंतर जितेंद्र आव्हाड घरी परतले आहेत. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आपण अती शहाणपणा केल्यानेच आपल्याला कोरोना झाल्याचं म्हटलं आहे. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

10 तारखेला डॉक्टरांनी मला रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं सांगितलं होतं. पण अतिशहाणपणा करण्याचा माझा स्वभाव आहे. त्याला आता मुरड घालावी लागेल. लोकांमध्ये जाण्याची जी सवय होती त्याचे परिणाम भोगावे लागले, अशी खंत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

अतिशहाणपणा केल्यानेच मला कोरोना झाला. लोकांनी मला मास्क घाला सांगितलं होतं. गर्दीत गेल्यावरच मी अनेकदा मास्क वर नाकावर सरकवून घ्यायचो. हे नियम समाजाने पाळायला हवेत. नियम पाळले असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, माझी मुलगी वारंवार रुग्णालयात जाण्याबद्दल सांगत होती. पण मी अती शहाणपणा करत कशाला रुग्णालयात जायचं म्हणत होतो. ताप, खोकला असला कोणताही त्रास नसल्याने कोरोना झाला आहे यापासून मी अनभिज्ञ होतो. मी जर तिचं ऐकलं असतं तर रुग्णालयात दोन तीन दाखल होऊन घरी आलो असतो. हे सगळं भोगावं लागलं नसतं, असं आव्हाड म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्री कमी पडत आहेत असं मी म्हणालोच नाही- पृथ्वीराज चव्हाण

-कोरोना झाल्याचं कळलं तेव्हाच मी चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यामध्ये…-जितेंद्र आव्हाड

-21 लाख कोटींच्या पॅकेजवर लक्ष ठेवण्यासाठी मोदींनी तयार केली टीम; ‘या’ पाच जणांवर दिली जबाबदारी

-‘या’ जर्मन कंपनीची चीनमधून एक्झिट; भारतात सुरू करणार प्रकल्प

-कर्नाटकात 31 मेपर्यंत महाराष्ट्र, गुजरातसह चार राज्यांमधील नागरिकांना प्रवेश नाही- येडियुरप्पा