महाराष्ट्र मुंबई

कोरोना झाल्याचं कळलं तेव्हाच मी चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यामध्ये…-जितेंद्र आव्हाड

मुंबई | कोरोनावर मात करुन राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जितेंद्र आव्हाड घरी परतले आहेत. मात्र आसयीयूत असताना आपण चिठ्ठी लिहून ठेवली होती, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

मला कोरोना झाल्याचं कळलं तेव्हा सर्वात पहिला मुलीचा विचार डोक्यात आला. आयसीयूत असताना मी एक चिठ्ठी लिहिली. त्या चिठ्ठीत मला काही झालं तर सगळी संपत्ती मुलीच्या नावे करण्यासंबंधी लिहिलं होतं, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.

10 तारखेला डॉक्टरांनी मला रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं सांगितलं होतं. पण अती शहाणपणा करण्याचा माझा स्वभाव आहे. त्याला आता मुरड घालावी लागेल. लोकांमध्ये जाण्याची जी सवय होती त्याचे परिणाम भोगावे लागले, अशी खंत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, काळजी घेणं गरजेचं असून मी काळजी घेतली नाही. 80 हजार लोकांमध्ये जाऊन खाण्याची पाकिटं वाटताना, लोकांसाठी काम करताना तब्बेतीचा विचार केलाच नाही. यामुळे कुटुंबीयांना काय त्रास होईल याचीही कल्पना नव्हती, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-21 लाख कोटींच्या पॅकेजवर लक्ष ठेवण्यासाठी मोदींनी तयार केली टीम; ‘या’ पाच जणांवर दिली जबाबदारी

-‘या’ जर्मन कंपनीची चीनमधून एक्झिट; भारतात सुरू करणार प्रकल्प

-कर्नाटकात 31 मेपर्यंत महाराष्ट्र, गुजरातसह चार राज्यांमधील नागरिकांना प्रवेश नाही- येडियुरप्पा

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ

-तुझ्या भीक माग्या देशासाठी काहीतरी कर; ‘या’ भारतीय क्रिकेटपटूचा आफ्रिदीला कडक सल्ला