राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांची महाराष्ट्रासाठी मोदी सरकारकडे मोठी मागणी!

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी पक्षातील नेते सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी नेते आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकारला महत्वाची मागणी केली आहे.

राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र शासन ‘किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजने’अंतर्गत मका, बाजरी ह्या भरडधान्यांची खरेदी करत असते. पण यावर्षी महाराष्ट्रात या भरडधान्यांचं अधिक उत्पादन झालं आहे. यामुळे केंद्र सरकारने यावर्षी भरड धान्यांची अधिक खरेदी करावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

खरीप हंगाम 2020-21 साठी केंद्र शासनाने महाराष्ट्राकडून 4 लाख 4 हजार 905 क्विंटल मका खरेदीस मान्यता दिली आहे. मात्र, यावर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मक्याचे उत्पादन जास्त घेतल्याने मक्याची खरेदी 15 लाख क्विंटलपर्यंत तर बाजरीची खरेदी मर्यादा 1 लाख 700 क्विंटल पर्यंत वाढवावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केंद्राकडे केली आहे.

कोरोनामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे या मागणीचा केंद्राने लवकरात लवकर विचार करावा, असं देखील भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच यापूर्वी देखील या संबंधित केंद्राशी दोनवेळा पत्रव्यवहार केल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अलीकडे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीत महाभारती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यासंबंधित छगन भुजबळ यांनी भाजप आमदारांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी मोठं वक्तव्य केलं होतं. भाजप मधील अनेक आमदार राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं.

भाजपमध्ये काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस मधील 70 टक्के आमदार आमचेच आहेत. आजी माजी आमदार महाविकास आघाडीत येण्याची इच्छा शरद पवार यांच्याकडे व्यक्त करत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणाला घ्यायचे कोणाला थांबवायचे? हे शरद पवार ठरवतील, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं.

छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. छगन भुजबळ यांचं वक्तव्यात किती टक्के सत्यता आहे हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! उर्मिला मातोंडकरांच्या ‘त्या’ प्रकरणाची मुंबई पोलिसांकडून दखल, FIR दाखल

नेता येण्यापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांची स्टेजवर तुफान हाणामारी; पहा व्हिडिओ

‘भाजपला एक जरी मत दिलं तरी रक्ताचे …’; पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं!

“दोन दिवसांपूर्वी महाजन यांनी 25 कोटींची जमीन अवघ्या दीड कोटीत खरेदी केली”

‘कोरोनाची लस घेतल्यास महिलांना दाढी येईल’; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचं गजब वक्तव्य!