पंकजा ताईने दवाखान्यात असताना फोन केला, मला खूप आनंद झाला- धनंजय मुंडे

मुंबई | माझ्या आजारपणाच्या काळात पंकजा ताईने फोन केला आणि सदिच्छा दिल्या, याचा आनंद वाटला, अशी भावनिक प्रतिक्रिया राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिली.

धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कळताच पंकजा यांनी तातडीनं त्यांना फोन केला होता. बंधू तब्येतीची काळजी घे आणि लवकर बरा होऊन घरी ये, अशा सदिच्छा पंकजा यांनी दिल्या होत्या. यावर धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली.

आमच्यात संघर्ष झाला होता. कुटुंबात दोन राजकीय विचारधारा आल्या. असं असतानाही बहिणीचा फोन आल्याचा आनंद झाला, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

धनंजय मुंडे यांनी नुकतीच करोनावर मात केली आहे. करोनाची लागण झाल्यानंतर दहा दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात असलेले मुंडे काही दिवसांपूर्वी घरी परतले असून सध्या क्वारंटाइन आहेत.

 

-गोपीचंद पडळकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…

-रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह टॅक्सीच्या टपावर ठेवून स्मशानभूमीत