“परिस्थिती गंभीर असली तरी सरकार खंबीर आहे”

मुंबई | सरकारने जमाबंदीचे आदेश दिले आहेत. त्याचे नागरिकांनी काटेकोर केलेच पाहिजे. परिस्थिती गंभीर असली तरी सरकार खंबीर आहे, असं नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

आपला लढा कोरोनासाराख्या झपाट्याने फैलावणाऱ्या रोगाशी आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. लॉक डाऊन आणि आरोग्य विभागाने केलेल्या सूचनांचे पालन केल्यास आपण या रोगावर मात करू शकतो, असा विश्वासही मुश्रीफ व्यक्त केला.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. याचा फटका अमेरिकी, इटलीसारख्या देशांना बसला आहे. या रोगावर अद्याप औषध किंवा लस नसल्याने खबरदारी घेणे आणि रोगाला प्रतिबंध करणे महत्त्वाचे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नगर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 261 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 256 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती समजत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-दुसऱ्या दिवशी घराबाहेर येऊन फिरण्यासाठी ‘जनता कर्फ्यू’ लावला होता काय?- राज ठाकरेंचा सवाल

-जमावबंदीचे आदेश झुगारुन वाहनांच्या रांगा; यांना नक्की जायचंय तरी कुठं???

-पुणेकरांना आता वाहनेही बाहेर काढता येणार नाहीत, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

-दहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक; रक्तदान करण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

-“आई दवाखान्यात असताना महाराष्ट्राचा लढवय्या लेक कोरोनाच्या विरोधात लढत आहे”