शरद पवारांभोवती फक्त महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचं राजकारण फिरतं- आव्हाड

मुंबई | पळपुटे कोण? या शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’मध्ये लेखामधून केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खडे बोल सुनावले आहेत. शरद पवार हे राजकारणातील भीष्म आहेत. गेली 50 वर्षापेक्षा जास्त काळ शरद पवारांभोवती फक्त महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचं राजकारण फिरतं. त्यामुळे मुख्यमंत्री असतील, विरोधक असतील,बाळासाहेबांनंतरची पिढी असेल सगळेच पवारांवर टीका करतात, असा टोला जितेंद्र आव्हाडांनी शिवसेनेला लगावला आहे. 

स्वाभिमानाच्या गोष्टी करायच्या नसतात. शरद पवारांचा स्वाभिमान इंदिरा गांधी, मुरली देवरा, मनोहर जोशी, सुधीर जोशी यांना चांगलाच माहित होता, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. 

इतिहास काढायचा तर आम्हालाही काढता येतो. 1977 चा इतिहास काढला तर सर्वांनाच त्रास होईल. पण जखमेवरची खपली काढायची नसते. इतिहासाची दाखले द्यायचे झाले तर सर्व रक्तवाहिन्या भळा भळा वाहतील, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

आमच्या जातीला आरक्षण नाही तेच बरं आहे अन्यथा मी कुठेतरी बाबू झालो असतो. मी घरच्यांना आधीच सांगितलं होतं… मला नोकरी करणारा नाही तर नोकरी देणारा व्हायचं आहे, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं होतं.

 नितीन गडकरींच्या याच वतक्तव्याला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जे लोक कर्तृत्त्वाने हरतात ते तिकिट मागण्यासाठी जातीचा आधार घेतात, असंही गडकरींनी काल नागपुरात बोलताना म्हटलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-