या 20 दिग्गज नेत्यांनी पवारांची साथ सोडली तर हे 9 जण धक्का देण्याच्या तयारीत!

मुंबई | 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी पवारांची साथ सोडली. केंद्रात लोकसभेच्या निकालात प्रचंड बहुमतांनी मोदींचं सरकार आरूढ झालं. ऑक्टोबर 2014 ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या. लोकसभेचीच पुनरावृत्ती होऊन महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचं सरकार आलं. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीला स्वपक्षातील आमदार आणि दिग्गज नेते हादरे देत होते.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, बबनराव पाचपुते, जयदत्त क्षीरसागर, विजयकुमार गावित, सुरेश धस, लक्ष्मणराव ढोबळे, संजय सावकारे, शिवाजीराव कर्डिले, लक्ष्मण जगताप, बाबासाहेब देशमुख कपिल पाटील, किसन कथोरे, निवेदिता माने, नरेंद्र पाटील, प्रशांत परिचारक, प्रसाद लाड, विनय कोरे, राहुल कूल, पांडूरंग बरोरा, सचिन अहिर या दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीला भगदाड पाडलं.

आत्तापर्यंत राष्ट्रवादीच्या 20 नेत्यांनी पक्षाला रामराम करत ‘कमळ’ हाती घेतलं तर कोणी ‘शिवबंधन’ मनगटावर बांधून घेतलं आहे. सत्तापक्षात जाण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपमध्ये रांग लावली आहे.

राष्ट्रवादीला सोडण्याच्या तयारीत असलेल्यांच्या यादीतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामध्ये संग्राम जगताप, वैभव पिचड, राणाजगजितसिंह पाटील, अवधुत तटकरे, बबन शिंदे, संदिप नाईक, दिलीप सोपल, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले हे देखील राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, गेल्या 2 दिवसात राष्ट्रवादीला 2 धक्के बसले आहेत. मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत धनुष्यबाण हाती घेतला तर चित्रा वाघ भाजपात प्रवेश करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड

-काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते म्हणतात वंचितबरोबर चर्चा सुरू; प्रकाश आंबेडकर म्हणतात…

-…भाजपवाल्यांनो हे फार काळ टिकणार नाही- सुशीलकुमार शिंदे

-कर्नाटकातील राजकीय नाट्याला वेगळं वळण; ‘हा’ पक्ष देणार भाजपला पाठिंबा???

-चित्रा वाघ यांनी राजीनाम्याचं ट्वीट केलं अन् लोकं म्हणाले; ‘ताई तुम्हीसुद्धा…!’