मुंबई | भाजपचे नेते किरीट सोमय्या हे बेजबाबदार वक्तव्य करण्यास प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच मागील लोकसभा निवडणुकीत त्यांचे पक्षाने तिकीट कापलं होतं. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केलं.
वाधवान प्रकरणी बातमी आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन त्या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या ज्यापध्दतीने बोलत आहेत ते बेजबाबदारपणाचं आहे, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला. आयएएस, आयपीएस अधिकारी पंतप्रधान कार्यालयाच्या अधीन येतात. त्यामुळे केंद्राला वाटत असेल तर ते कारवाई करू शकतात असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, लॉकडाउनची सक्तीनं अमलबजावणी केली जात असताना ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान यांच्यासह २३ जण सुटी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचं प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली होती.
महत्वाच्या बातम्या –
-बीएमसीच्या मदतीसाठी अक्षय कुमार धावला, मास्क आणि टेस्टिंग किट्ससाठी केली इतक्या कोटींची मदत
-कामापेक्षा मोठा कोणता ‘धर्म’ नाही या गोष्टीची जाणीव झाली- सत्यजीत तांबेvvvvv
-बारामतीत ‘भिलवाडा पॅटर्न’ राबवा- अजित पवार
-दुसऱ्याचं रिजार्ज करा आणि मिळवा नफा; जिओ, एअरटेलची अनोखी ऑफर