रायगड : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उर्जामंत्री सुनिल तटकरे यांना रायगडमध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि सुनिट तटकरेंचे कट्टर समर्थक प्रमोद घोसाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः घोसाळकर यांच्या हातात शिवबंधन बांधले. यावेळी म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे, अर्जुन खोतकर हेही मातोश्रीवर उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या प्रमोद घोसाळकरांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे. या पक्षांतराने सुनिल तटकरेंच्या जिल्ह्यातील वर्चस्वालाही धक्का बसण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांचा पुतण्या आणि श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी देखील राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच अवधूत तटकरे हातात ‘शिवबंधन’ बांधणार आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीसोबतच तटकरे कुटुंबालाही भगदाड पडलं आहे. सुनिल तटकरेंचे बंधू अनिल तटकरे यांचे पुत्र अवधूत तटकरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत सार्वजनिकपणे नाराजी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून अवधूत यांच्या ‘मातोश्री’वर वाऱ्या सुरू होत्या.
महत्वाच्या बातम्या-
डी.के शिवकुमार यांना झालेली अटक बदला घेण्यासाठी – राहुल गांधी – https://t.co/ldS0Crkwzf @RahulGandhi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 4, 2019
नारायण राणे फक्त कणकवलीपुरतेच उरलेत; शिवसेनेच्या ‘या’ खासदाराचा टोला – https://t.co/aWWhVx8qwB @MeNarayanRane @Vinayakrauts @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 4, 2019
“वंचित आघाडीचा विरोधी पक्षनेता नाही तर मुख्यमंत्री असेल” – https://t.co/VjS0VuaaAQ @Prksh_Ambedkar @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 4, 2019