राज्याला आज नाटकाची नाही तर सहकार्याची गरज आहे- रोहित पवार

मुंबई | भाजपने आज ‘माझे अंगण, माझे रणांगण‘ आंदोलनाची हाक दिली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. राज्याला आज नाटकाची नाही तर सहकार्याची गरज असल्याचं म्हणत पवार यांनी भाजपच्या आंदोलनावर टीका केली आहे.

मास्क वापरण्याचा आणि अंतर ठेवण्याचा नियम वगळता हे सगळं नाटकाच्या स्क्रिप्टप्रमाणेच वाटलं. आज राज्याला अशा नाटकाची नाही तर सहकार्याची गरज आहे. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो, राज्यातील लोकांचा आणि कोरोना वॉरियर्सचा अपमान करू नका, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

राजकारण न करण्याचं अनेकदा आवाहन करुनही तुम्ही ते टाळूच शकत नाही का? एकतर लोकांच्या हक्कासाठी आणि कोणत्याही उत्स्फूर्त आंदोलनासाठी अशा लिखित मार्गदर्शनाची गरज नसतेच. पण तुम्ही एखाद्या दिग्दर्शकाप्रमाणे कपडे, रंग, मीडिया, घोषणा, अंतर असं सगळं कसं लिहून दिलं, असंही रोहित पवारांनी म्हटलंय.

दरम्यान, आधी म्हणायचं ‘कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? आणि आता महाराष्ट्र बचावचे गळे काढत अंगणालाच रणांगण करायचं. अरे किती हिणवणार? रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या करोना योद्धांचा आंदोलनाच्या नावाने अपमान तरी करू नका, असं म्हणत रोहित पवारांनी भाजप नेत्यांवर निशणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मुंबईतले ठाकरे-फाकरे काही करु शकले नाही, नगरच्या कोपऱ्यात बसून माझं काय करणार- निलेश राणे

-‘…ते आज महाराष्ट्र वाचवायला निघालेत व्वा’; अमोल मिटकरींचा भाजपला टोला

-गरिबांसाठी 50 हजार कोटींचं पॅकेज द्या- देवेंद्र फडणवीस

-मार्च ते ऑगस्ट या 6 महिन्यांसाठी कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा

-कोरोनाला हरवण्यासाठी खास नागपुरकरांसाठी तुकाराम मुंढेंनी काढला नवा आदेश