Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

‘महिला असलीस तरी छपरीच तू’; राष्ट्रवादीकडून केतकीवर जहरी टीका

ketaki chitale

मुंबई | अभिनेत्री केतकी चितळेच्या शरद पवारांवरील वादग्रस्त पोस्ट नंतर राज्यात वाद वाढला आहे. या वादग्रस्त पोस्टनंतर राष्ट्रवादीकडून केतकीवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

केतकी चितळेनं शरद पवारांच्या शारिरीक व्यंगावरून टीका केल्यानं सामान्य नागरिक देखील संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. अशात आता वाद वाढण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी केतकीला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सध्या रूपाली पाटील यांनी दिलेल्या उत्तराची देखील चर्चा होत आहे.

चि चि चवताळलीस बाई तू, महिला असली तरी छपरीच तू, संस्कार नसलेली केतकी, इतकीशी कशी चवताळलीस, असं रूपाली पाटील म्हणाल्या आहेत.

हरामखोर विकृती, मनोरुग्ण तुला चपलेने 100 मारून 1 मोजले पाहीजे. कशात ना मशात केतकीबाई तमाशात, असं म्हणत पाटील यांनी केतकीला उत्तर दिलं आहे.

लवकरच जंगी चोपाची गरज आहे हिला, मिळणारच बाई तुला चोप, असं म्हणत केतकी चितळेवर राष्ट्रवादी महिला आघाडी तुटून पडणार असल्याचा इशारा रूपाली ठोंबरे यांनी दिला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अगोदर केतकीनं छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांबाबतही वादग्रस्त पोस्ट केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

“राष्ट्ररक्षणासाठी हिंसा करण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलाय” 

दाऊद इब्राहिम गँगच्या टार्गेटवर कोण?; NIA च्या तपासातून धक्कादायक खुलासा 

खासदाराचा न्यूड व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ! 

‘आज मायेचं छत्र गमावलं’; बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं निधन 

पुतिन पुन्हा एकदा भडकले?; आता रशियाने ‘या’ देशाला धमकावलं