‘राष्ट्रवादी’ला सर्वात मोठा धक्का; साताऱ्यातील राजांचा राजीनामा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला एकामागून एक बसणारे धक्के काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. आता साताऱ्यातून राष्ट्रवादीसाठी चिंता वाढवणारी बातमी आली आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाद या सगळ्या घडामोडींना कारणीभूत ठरला आहे. शरद पवारांनी मनधरणी केल्यानंतरही शिवेंद्रराजे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

स्वतः शरद पवार यांनी शिवेंद्रराजेंना समजावण्याचा प्रयत्न केला. पक्षाला तुमची गरज आहे. उदयनराजेंचं मी पाहतो, तुम्ही पक्ष सोडून जाऊ नका, असं शरद पवार यांनी शिवेंद्र राजेंना म्हटलं होतं. मात्र शिवेंद्रराजे थांबले नाहीत.

नुकताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवला होता. या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी एकमताने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा कौल दिला. त्यावर आपण कार्यकर्त्यांसोबत असल्याचं सांगत शिवेंद्रराजेंनी भाजपत जाण्याचे स्पष्ट संकेत दिले होते.

आता शिवेंद्रराजेंनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यात जमा आहे. उद्या ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

२००४ पासून शिवेंद्रराजे सातत्याने राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून येत आहे. जावळी हा त्यांचा गड मानला जातो. आता याच जावळी तालुक्यातील अनेक नेते आणि कार्यकर्ते शिवेंद्रराजे यांच्यासोबत भाजपवासी होणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला या भागात मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादीला धक्के देण्याचं काम भाजपनं अजूनही सुरु ठेवलं असल्याचं यानिमित्ताने सिद्ध झालं आहे. आगामी काळात आणखी मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-पुढच्या 15 वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही- चंद्रकांत पाटील

-शिवेंद्रराजेंनी पवारांना अव्हेरलं; आज राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, उद्या भाजपत प्रवेश!

-फोडाफोडीच्या राजकारणानंतरही शरद पवार आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर

-‘दिव्यांग प्रवासी डब्या’तून गरोदर महिलाही प्रवास करु शकतात…; अमित ठाकरेंच्या मागणीला यश

-विखेंना शह; सत्यजीत तांबे यांची शिर्डीतून उमेदवारीची मागणी