मुंबई | राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपनं ‘माझं अंगण रणांगण’ आंदोलनाची हाक दिली. भाजपच्या या आंदोलनावर सत्ताधारी पक्षांनी टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार अमोल मिटकरी यांनीही भाजपवर टीकेची तोफ डागली आहे.
महाराष्ट्र पाण्यात बुडत असताना ज्यांनी शांतपणे पाहिला, संकटकाळातील निधी ज्यांनी दिल्लीला पाठवला, शेतकरी आत्महत्येचा आलेख ज्यांनी चढता ठेवला ते आज महाराष्ट्र वाचवायला निघालेत व्वा, असा उपरोधिक टोला अमोल मिटकरी यांनी भाजपला लगावला आहे.
राजकुमार यांचा एक गाजलेला डायलॉग ‘कव्वे की चोंच मारने से पहाड नहीं तुटते’, असं ट्विट करत अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडलंय. मिटकरी यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भाजपच्या आंदोलनावर टीका केली आहे.
हातात काळं घेताना एकदा तरी विचार करा. आपण अहोरात्र महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या डॉक्टरांचा, पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि आरोग्य सेवकांचा अपमान तर करत नाही ना? असा विचारही जनतेने मनात आणावा, असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.
महाराष्ट्र पाण्यात बुडत असतांना ज्यांनी शांतपणे पहिला,संकटकाळातील निधी ज्यांनी दिल्लीला पाठवला , शेतकरी आत्महत्येचा आलेख ज्यांनी चढता ठेवला ते आज महाराष्ट्र वाचवायला निघालेत व्वा !
राजकुमार यांचा एक गाजलेला डायलॉग
“कव्वे की चोंच मारने से पहाड नहीं तुटते.”— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 22, 2020
महत्वाच्या बातम्या-
-गरिबांसाठी 50 हजार कोटींचं पॅकेज द्या- देवेंद्र फडणवीस
-मार्च ते ऑगस्ट या 6 महिन्यांसाठी कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा
-कोरोनाला हरवण्यासाठी खास नागपुरकरांसाठी तुकाराम मुंढेंनी काढला नवा आदेश
-मुलीचा विवाह सोहळा पार पडताच गँगस्टर अरूण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका
-डोमकावळ्यांची फडफड औटघटकेची ठरेल; संजय राऊतांची अग्रलेखातून सडकून टीका