उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित???

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशी लढत होणार असल्याची माहिती आहे.

उदयनराजे भोसले यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता साताऱ्यात पोटनिवडणूक होत आहे.

श्रीनिवास पाटील हे दोन वेळा जुन्या कराड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून श्रीनिवास पाटील यांची ओळख आहे.

श्रीनिवास पाटील हे अगोदर आयएएस अधिकारी होते. शरद पवारांनी श्रीनिवास यांना राजकारणात आणल्याचं बोललं जात आहे. श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीमुळे उदयनराजेंसमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं.

दरम्यान, उदयनराजेंविरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा होत्या. यावर लोकशाही आहे. कुणीही उभं राहु शकतं, अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली होती.

महत्वाच्या बातम्या-