महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादीच्या या दिग्गज नेत्यांनी घेतला भाजपचा झेंडा हाती!

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते, आमदार सेना-भाजपमध्ये प्रवेश करत आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेल-राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये पक्षप्रवेशाचा  झाला आहे. 

वैभव पिचड, साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, मुंबईच्या वडाळ्याचे काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर आणि नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन या चार आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या आध्यक्षा चित्रा वाघ यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या नेत्यांसह त्यांच्या समर्थकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार संदीप नाईक आणि मुंबईचे माजी महापौर सागर नाईक हे देखील भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मात्र नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या 57 नगरसेवकांचा तांत्रिक कारणांमुळे भाजप प्रवेश लांबणीवर गेल्याची माहिती मिळतं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी मोठा धक्का मानला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-गरवारे क्लबमध्ये भाजपची ‘मेगा भरती’; ‘भाजप जोमात राष्ट्रवादी कोमात…!’

-…तर मी अमित शहांना भेटायला गेल्याचं छापलं असतं- शरद पवार

-सुनिल तटकरे गेले चंद्रकांत पाटलांच्या बंगल्यावर अन् नव्या राजकीय चर्चांना उधाण

-शरद पवार शेजारी बसलेले… अन् मुख्यमंत्री फोडाफोडीच्या राजकारणावर म्हणतात…

-पवार साहेब… ‘या’ नेत्याने पद्धतशीरपणे राष्ट्रवादीचं वाटोळं केलंय- जितेंद्र आव्हाड

IMPIMP