मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा ‘हा’ आमदार भाजपच्या वाटेवर???

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसला बसणारे राजकीय धक्के थांबवण्याचं नाव घेण्याचं दिसत नाही. राज्यभरातून एकामागून एक नेता राष्ट्रवादीला रामराम करत सत्ताधारी पक्षात जात आहे. आता नव्याने एक नाव समोर येत आहे.

राष्ट्रवादीचे वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या पक्ष बदलामागे त्यांचे व्याही भाजप खासदार प्रतापराव पाटील चिकटगावकर असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या माध्यमातून येत्या 2 दिवसात भाऊसाहेब चिकटगावकर भाजप प्रवेश करतील, असं बोललं जात आहे.

शिवस्वराज्य यात्रा ज्या जिल्ह्यात जाईल, तेथील स्थानिक आमदार, खासदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होतील, असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा औरंगाबाद जिल्ह्यात आली तेव्हा औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या  भाऊसाहेब चिकटगावकर पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे चिकटगावकर आता कोणता निर्णय घेतात याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे.

महत्वाच्या बातम्या-