मुंबई | राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे विश्वासू तसंच निकटवर्तीय आमदार नरहरी झिरवळ यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपच्या अशोक उईके यांनी आपला अर्ज माघारी घेतल्यामुळे नरहरी झिरवळ यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. (Narhari Zirwal Elected Assembly Deputy Speaker)
नरहरी झिरवाळ यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. झिरवळ यांचं काम आम्ही समोरून पाहिलं आहे. शेतात नांगर धरणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आज उपाध्यक्ष पदावर बसतोय याचा आनंद आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत. (Narhari Zirwal Elected Assembly Deputy Speaker)
राज्यतील जनतेचे प्रश्न सभागृहात आक्रमकपणे मांडले गेले पाहिजेत. ते सोडवण्याची धमक झिरवाळ यांच्यामध्ये आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
झिरवाळ यांना विषयाची उत्तम जाण असते. आपला मुद्दा ते अतिशय प्रभावीपणे सभागृहात मांडतात. आदिवासी समाजाचे सुख व दुःख दोन्ही गोष्टी त्यांना माहिती आहेत. निश्चितपणे अशा विचारांचा माणूस उपाध्यक्षपदी बसेल तेव्हा समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल, अशा भावना राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
मा. नरहरी झिरवाळ यांचे काम आम्ही समोरून पाहिले आहे. शेतात नांगर धरणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आज उपाध्यक्ष पदावर बसतोय याचा आनंद आहे. राज्यतील जनतेचे प्रश्न सभागृहात आक्रमकपणे मांडले गेले पाहिजेत. ते सोडवण्याची धमक झिरवाळ यांच्यामध्ये आहे – ना. @AjitPawarSpeaks pic.twitter.com/oN5kYJPNMc
— NCP (@NCPspeaks) March 14, 2020
महत्त्वाच्या बातम्या-
-सावधान… विदर्भामध्येही होतोय कोरोनाचा शिरकाव
-बाबासाहेबांच्या लंडनमधील स्मारकाचा खटला महाराष्ट्र सरकारनं जिंकला
-पक्षाची बदनामी होतेय म्हणुन राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षाचं निलंबन
-…म्हणून राज्यसभेची निवड बिनविरोध?, अधिकृत घोषणा 18 मार्चला
-‘बाळासाहेब थोरातांनी वापरला हॅशटॅग सुटाबुटातलं लुटारु सरकार’