मोदींनी शरद पवारांची सुरक्षा हटवताच रोहित पवार भडकले; म्हणाले…

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची केंद्र सरकारने सुरक्षा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकाराने राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. तसंच पवारांची सुरक्षा हटवल्याने केंद्र सरकारला काही प्रश्न देखील त्यांनी विचारले आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अजूनही सुरक्षा आहे मग शरद पवार यांची सुरक्षा का हटवलीये? असा सवाल रोहित यांनी केंद्र शासनाला विचारला आहे. केंद्र सरकार ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला सुरक्षा देण्याचा विचार करतं त्यावेळी ती व्यक्ती कितीवेळा मंत्री राहिलीये… कोणतं खातं सांभाळलंय…. याचा विचार करतं. शरद पवार स्वत: संरक्षण मंत्री राहिले आहेत. 2 वेळा कृषीमंत्री राहिलेले आहेत. शरद पवार देशात ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. सुरक्षा देत असताना पार्टी बघितली जात नाही, अशी आठवण रोहित पवार यांनी केंद्र सरकारला करून दिली आहे.

भाजपला दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रात तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. सरकार चांगल्या पद्धतीने काम करतंय. म्हणूनच याचा राग मनात धरून भाजपचं केंद्रिय नेतृत्व सूडबुद्धीनं वागतंय, असा आरोप देखील त्यांनी केला.

दरम्यान, महाराष्ट्रात पवारांना झेड सुरक्षा आहे मात्र पवारांच्या दिल्लीतील घराची सुरक्षा केंद्राने काढून घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील केंद्र शासनावर टीकेची झोड उठवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-