कालंच राष्ट्रवादीकडून आमदारकी मिळवलेला ‘हा’ आमदार भाजपच्या गोटात?

मुंबई | राजकारणात केव्हा काय होईल याविषयी काहीही सांगता येत नाही. अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. नुकतंच राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांचा निकाल जाहीर झाला आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 4 जागांवर विजय मिळवला आहे. तर भारतीय जनता पार्टीने 1 जागा आणि अपक्ष उमेद्वाराने 1 जागेवर विजय मिळवला आहे. सतीश चव्हाण यांनी देखील शिक्षक आणि पदवीधर  मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवला आहे.

शुक्रवारी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि लगेच शनिवारी सतीश चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास केला. यामुळे राजकीय चर्चांना एकंच उधाण आलं आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि सतीश चव्हाण यांनी एकाच सीटवरून प्रवास केला आहे.

नेमके एकाच दिवशी एकाच सीटवरून फडणवीस आणि चव्हाण यांनी प्रवास करण्यामागे काय कारण असेल? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहेत. यामागे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण यांनी सलग दोन वेळा औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून विजय मिळवला होता. यावेळी देखील त्यांनी या निवडणुकीत विजय मिळवत हॅट्रिक केली आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून सतीश चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे शिरीष बोराळकर उतरले होते. सतीश चव्हाण या यावेळी निवडणुकीत तब्बल 116638 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या शिरीष बोराळकर यांना 58743 मते मिळाली आहेत. सतीश चव्हाण हे जवळपास 57895 मताधीक्क्यांनी विजयी झाले आहेत.

तसेच महाविकास आघाडीने इतरही जागेंवर घवघवीत यश मिळवले आहे. अगदी भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे आणि नागपूर मतदार संघात देखील महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून तिन्ही पक्ष संयुक्तपणे लढवत असलेली ही पहिलीच स्थानिक निवडणूक आहे. यामुळे या निवडणुकीच्या निकालावर सर्वांचंच लक्ष लागून होतं.

महाविकास आघाडी बरोबरच भारतीय जनता पार्टीनेही या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. या निवडणुकीच्या निकालाची महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आमीर खान आणि किरण रावचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पहा व्हिडिओ

मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या सुनावणी अगोदरच अशोक चव्हाणांनी दिली महत्वाची माहिती

पंजाब मधील रस्त्यावर कंगना राणावतची शस्त्रक्रिया; फोटो व्हायरल

शरद पवारांचं राज ठाकरेंबद्दल मोठं विधान! ठाकरेंची प्रशंसा करत पवार म्हणाले…

कोरोनाकाळात ‘या’ राज्याचा मोठा निर्णय! 31 मार्च पर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद राहणार