राष्ट्रवादीला गळती; ‘हा’ आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश???

मुंबई : निवडणुका तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना चांगलाच जोर आला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपच्या गळाला लागल्याचं बोललं जात आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्याचे आमदार वैभव पिचड हे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह पिचड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. वैभव पिचड यांचे वडिल मधुकर पिचड हे अनेक वर्षे मंत्री होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे देखील शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. यामुळे राष्ट्रवादीला आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा मोठा धक्का बसल्याचं मानला जात आहे.

छगन भुजबळ हे येत्या 27 जुलैला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे सचिन अहिर यांना शिवसेनेत जाण्यापासून रोखत आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-लक्ष्मण मानेंचा ‘वंचित’ला दे धक्का; ‘महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी’ची घोषणा

-आजारपणातून बरं होताच अकबरुद्दीन ओवैसींकडून ‘15 मिनिट’वाल्या वक्तव्याचा पुनरुच्चार

-फडणवीसांची महाजनादेश यात्रा; उद्घाटनाला शहा तर समारोपाला मोदी

-विराट कोहलीला इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी मिळणारी किंमत ऐकून थक्क व्हाल!

-मॉब लिंचिंगविरोधात 49 कलाकारांचं पंतप्रधानांना पत्र