राष्ट्रवादीच्या आमदाराचं ‘खाली डोकं वर पाय’; वाचा नेमका काय आहे प्रकार

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन पहायला मिळत आहे.

 आज राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. शिवाजी महारांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या अभिभाषणाच्या वेळी विरोधक आक्रमक झाले आहेत.

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सभागृहात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपलं भाषण सुरू केलं. मात्र, राज्यपालांचं अभिभाषण सुरू होताच महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणाबाजी केल्यानं भगतसिंह कोश्यारी यांनी काढता पाया घेतल्याच पहायला मिळाल.

भगतसिंह कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विधानपरिषदचे आमदार संजय दौड यांनी पायऱ्यावरच खाली डोक वर पाय करत राज्यपालांचा निषेद केला आहे.

राज्यपालांनी राज्याचा, राष्ट्रगीताचा अपमान केला आहे. मी खाली डोकं वर पाय करून त्यांचा निषेद केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार संजय दौड यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निषेधासन केलं.

राज्यापाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध  करण्यासाठी दौंड यांनी शीर्षासन केलं.

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांनी सभागृहात प्रचंड घोषणाबाजी केली.

गोंधळामुळे राज्यपालांनी सभागृहातील अभिभाषण 5 मिनिटांत संपवलं. आणि राज्यपाल सभागृहातून निघून गेले.

महत्त्वाच्या बातम्या –

  अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरुन विरोधक आक्रमक 

  “भाजपकडून फक्त हूल दिली जाते, त्याला वादळ नाही आदळआपट म्हणतात”

  सर्वात मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का

  “सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्षे दूध पाजले, ते पिल्लू आता आमच्यावरच फुत्कारतंय”

  आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक सज्ज