पुणे | रायगडाच्या संवर्धनाचं काम का रखडलं आहे हा प्रश्न माझ्यापेक्षा खासदार संभाजीराजेंना विचारलेला बरा. माझ्या माहितीप्रमाणे काही प्रमाणात काम झालंय पण रायगड सतराव्या शतकात जसा होता तसा बघायला सगळ्यांना आवडेल. ते जगातील आठवं आश्चर्य असेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
कोरोनामुळे शिवराज्याभिषेक दिन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करावा लागतोय. आज लोकांचं राज्य आलं आहे, खऱ्या अर्थाने हा लोकांचा उत्सव आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.
निसर्ग चक्रीवादळामुळं झालेल्या नुकसानीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत चर्चा झाली. राज्याच्या कॅबिनेटमध्ये नुकसान भरपाईबद्दल निर्णय होईल, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलंय.
पुणे आणि नाशिक दरम्यानचा रेल्वे प्रकल्प मागील 21 वर्षं रखडला होता. आता त्याला गती मिळतेय. मात्र त्याबद्दल कोणी आत्ताच श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये. या रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र सरकार 20 टक्के आणि राज्य सरकार 20 टक्के वाटा उचलणार आहे. उरलेली 60 टक्के रक्कम कर्जाच्या स्वरुपात उभारली जाणार आहे, असं अमोल कोल्हेंनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्या; राजेंद्र विखे पाटलांची राज्यपालांकडे मागणी
-विद्यार्थी देशाचे भविष्य, कोणत्याही परिस्थितीत त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही- बच्चू कडू
-मंत्री आदित्य ठाकरेंकडून पर्यावरण खात्यासंबंधी मोठा बदल!
-महसूलमंत्री थोरात यांचा राज्यातल्या जनतेला करासंबंधी मोठा दिलासा
-येत्या ४८ तासात महाराष्ट्रातील ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता