“आई म्हणून या गोष्टीचं खूप वाईट वाटतं”, आर्यन प्रकरणी सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला झालेली अटक आणि त्यानंतर त्याची झालेली सुटक या सर्व प्रकरणाची आता एकच चर्चा सुरु आहे. अनेक सेलिब्रेटी तसेच राजकीय नेते देखील या प्रकरणावर बोलताना दिसत आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी या विषयावर भाष्य केलं. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांचं त्यांच्याकडे लक्ष वेधलं आहे.

आर्यन खानने ड्रग्ज घेतलं नव्हतं तर मग त्याला 25 दिवस तुरुंगात का ठेवलं? असा सवाल करतानाच एक आई म्हणून या गोष्टीचं खूप वाईट वाटतं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

आर्यन खानवर बोलताना त्यांनी शाहरुख खानबद्दलही भाष्य केलं. शाहरुख खान हा एक आंतरराष्ट्रीय कलाकार आहे, मात्र अशी प्रकरणं घडल्यामुळे त्यांच्यासोबतच भारताचं नावही खराब होतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी ही वक्तव्य केली आहेत. आर्यन खाननं ड्रग्ज घेतलं नाही. मुलाकडे काहीच सापडलं नाही. एखादा मुलगा निर्दोष असेल तर मग त्याला 25 दिवस कोठडीत का ठेवलं? आई म्हणून मला त्याचं वाईट वाटतं.

शाहरूख खान हा महाराष्ट्रापुरता, देशापुरता मर्यादित नाही तर आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. आम्ही परदेशात जातो तेव्हा बॉलिवूडबद्दल खूप विचारलं जातं. पण अशा प्रकरणाने भारताचंही नावंही खराब होतं. चूक नसतानाही अधिकारी कारवाई करत असेल तर चुकीचं आहे, असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

चंद्रकांत पाटलांना टोला मारला-

सु्प्रिया सुळे यांनी यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देखील टोला लगावला. माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. आमच्या तोंडी अशी भाषा नसते. अशी भाषा आमच्या वाचनात नाही, असा टोला त्यांनी लगावला.

नवाब मलिक हे रोज भाजपवर टीका करतात असा प्रश्न विचारला असता ‘असे लोक मी खिशात ठेवतो’ असे वक्तव्य पाटील यांनी केले होते. यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं.

आम्ही असले प्रकार कधी केले नाहीत-

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काय होतंय ते बघू मात्र अशा निवडणुकीत हारजीत ही होतच असते. मात्र, आम्ही दडपशाहीचं राजकारण कधी करत नाही. ईडीच्या मार्फत नोटीसा पाठवण्याचे प्रकारही आम्ही कधी केले नाहीत, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे आदेश-

पुण्यातील या कार्यक्रमावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. पत्रकार सांगतात की पुण्यातील लोक भाजपला थकले आहेत. एकदा मतदान केलं, पण महापौरांकडून चांगलं काम झालं नाही, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान येणाऱ्या निवडणुकीत महापौर राष्ट्रवादीचा होईल, असं लोक सांगत असल्याचं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. अजितदादांकडून काम करुन घ्या, निवडणुकीच्या कामाला लागा. पुढचा महापौर हा राष्ट्रवादीचाच असेल. प्रचार सुरु करा, असे आदेशच त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले.

मोदी सरकारकडे मागितली ही भाऊबीज-

इंधन दरवाढीवरूनही खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक भाऊबीज मागितली आहे.

घरगुती गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. भाऊबीजेच्या दिवशी महिला आंदोलन करणार आहेत. सिलिंडचे दर कमी करुन भाऊबीज द्या, अशी मागणी त्यांनी मोदींकडे केली आहे.

ही बातमी वाचली का?- …तर आर्यन खानला पुन्हा होऊ शकते अटक; मोठी माहिती आली समोर

महत्वाच्या बातम्या-

“नेत्यांना आता तोंड लपवून पळावं लागणार”; मोठा गौप्यस्फोट करण्याची घोषणा

“राज्यात शिवसेना- भाजपचं बहुमत होत तरीही पवारांनी सरकार बनवलं, मग हा सत्तेचा दुरूपयोग नाही?”

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये आज पुन्हा वाढ, वाचा आजचा दर

कुत्र्याचा अनोखा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तुफान व्हायरल

आर्यनच्या सुटकेवेळी चोरट्यांना सुळसुळाट, अबब… ‘या’ गोष्टींची झाली चोरी

“तुम्ही जे केले ते आता तुम्हाला भोगावं लागणार” आर्यनच्या सुटकेनंतर सर्वात मोठी प्रतिक्रिया