सातारा | गेले अनेक दिवस राष्ट्रवादीचे नेते सत्ताधारी भाजप सेनेमध्ये प्रवेश करत आहेत. याच्यामध्ये आता साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांची भर पडणार आहे, अशी एकंदर परिस्थिती आहे. मी भाजपत जाण्यासंबंधी लोकांचे हित पाहून निर्णय घेईन, असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.
गेले अनेक दिवस उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. पत्रकारांनी आज त्यांना याच विषयावर बोलतं करण्याचा प्रयत्न केला असता, माझे भाजपतील नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. भाजपच नव्हे तर इतर पक्षातील नेत्यांसोबतसुद्धा चांगले संबंध आहेत. त्याचा अर्थ असा नाही की मी त्याच पक्षात प्रवेश करेल, असंही सांगायला ते विसरले नाहीत.
उदयनराजे यांचे भाऊ आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी याअगोदरच पवारांना धक्का देत भाजपत प्रवेश केला आहे. त्यानंतर उदयनराजे भाजपत आले तर त्यांचे स्वागतच आहे आणि ते लवकरच भाजपात येतील असा मला विश्वास आहे, असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उदयनराजे भोसले जर भाजपत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
इतर नेत्यांसारखंच उदयनराजेसुद्धा पवारांना धक्का देणार का? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, उदयनराजे यांनी जर भाजपात प्रवेश केला तर राष्ट्रवादीसाठी तो फार मोठा धक्का असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
काँग्रेसशी एकनिष्ठ राहून काहीच मिळालं नाही- दिलीप मानेhttps://t.co/MRtIEA6tWA @Mla_DilipMane @INCMaharashtra @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 23, 2019
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारच काँग्रेसवर नाराज??? https://t.co/UnC2Hieqmf @VijayWadettiwar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 23, 2019
“सावरकरांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालणं आणि त्यांची विटंबना करणं निंदनीय”- https://t.co/3HmBuBuWFn @subodhbhave
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 23, 2019