मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांच्या हस्ते अनेक विकासकामांचं भूमिपूजन केलं जात आहे. मुंबईतील मेट्रो भूमिपूजनच्या कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे खासदार उपस्थिती राहिल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे सहकारी आणि खासदार माजिद मेमन यांनी मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यामुळे ते देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान याबाबत मेमन यांनी प्रतिक्रिया दिली असून मी पक्ष बदलणार नाही. शरद पवारांचा मी विश्वासू सहकारी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा माजिद मेमन यांनी केला आहे.
मेमन यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी मेट्रो भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं किती गोष्टींसाठी अभिनंदन करु? काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आलं. आता समान नागरी कायदा आणि राम मंदिराचं स्वप्नही पूर्ण होईल असाही विश्वास उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या-
आम्हाला सत्तेची हाव नाही पण राज्याच्या विकासासाठी सत्ता हवी आहे – उद्धव ठाकरे –https://t.co/iIUwz8dRgO @ShivSena @uddhavthackeray @BJP4Maharashtra @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 7, 2019
“मिलिंद देवरांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय योग्यच” – https://t.co/XvICK0Dses @sanjaynirupam @milinddeora
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 7, 2019
“केवल सम्पर्क टूटा है, संकल्प नहीं; हौसले अब भी बुलंद है” – https://t.co/DNsPzYGsfZ @Chandrayan2 @mangeshkarlata @isro
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 7, 2019