मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बराच वाद निर्माण झालेल्या आरेमधील मेट्रो कारशेडच्या वादग्रस्त कामाला स्थगिती दिली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा सुचवली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीच ही माहिती दिली आहे.
गोरेगावमध्ये 102 हेक्टर जागेवर आरपीएफचे मैदान आहे. ज्याचा अधिकाधिक वापर हा लग्नाच्या कार्यक्रमांसाठी होतो. त्यामुळे 60 हेक्टर जागेवर तिथे मेट्रो कारशेड उभारता येईल असा पर्याय सुचवला आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली आहे.
आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता. त्या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. त्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला आहे की, हे कारशेड उभारायचे कुठं? त्यामुळे आम्ही विधानसभेमध्ये असताना उद्धव ठाकरे यांना पर्यायी जागा सुचवली आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आरेमधील मेट्रो कारशेडच्या वादग्रस्त कामाला स्थगिती दिल्याने भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. तुम्ही असेच जर निर्णय घेत राहिलात तर गुंतवणूकदार यापुढे गुंतवणूक करायला पुढे येणार नाही, असं फडणवीस म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे घुसखोर” – https://t.co/Nx2QanfqIW @adhirrcinc @BJP4India @INCIndia #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
महापोर्टल तातडीने बंद करा; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी – https://t.co/FZjWF0jbsU @supriya_sule @uddhavthackeray #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
फडणवीसांच्या ‘पुन्हा येईल’ला नवाब मलिकांचं शायरीतून उत्तर! – https://t.co/xDHIwuM3wn @nawabmalikncp @Dev_Fadnavis @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019