शरद पवारांनी ‘राष्ट्रवादी युवक’वर सोपवली ही मोठी जबाबदारी!

मुंबई |  आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आणि सेना भाजपच्या अनुक्रमे जनआशीर्वाद आणि महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘शिवस्वराज्य’ यात्रेचं आयोजन केलं आहे. आणि या महत्वपूर्ण यात्रेची जबाबदारी शरद पवारांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसवर सोपवली आहे.

शिवस्वराज्य यात्रेची धुरा शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर साताऱ्याचे खासदार आणि छत्रपतींचे वंशज उदयनराजे भोसले स्टार कॅम्पेनर म्हणून या यात्रेत सहभागी होणार आहेत.

शिवस्वराज्य यात्रेच्या संपूर्ण चोख नियोजनाची जबाबदारी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख तसेच कार्याध्यक्ष रवीकांत वरपे आणि सूरज चव्हाण यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मगाव असणाऱ्या जुन्नर तालुक्यातल्या शिवनेरीवरून 6 ऑगस्ट रोजी या यात्रेला सुरूवात होणार आहे. सुरूवातीच्या टप्प्यात 3 विधानसभा मतदारसंघात जाऊन ही रॅली लोकांशी संवाद साधेल.

यात्रेचा दुसरा टप्पा 16 ऑगस्ट पासून तुळजापूरमधून चालू होईल. तर यात्रेची सांगता स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडावर होईल. 

दरम्यान, स्वपक्षातील नेत्यांना पक्षांतर करण्यापासून रोखणं आणि सेना-भाजपकडून सत्ता हिसकावून घेणं ही दोन मोठी आव्हान राष्ट्रवादीपुढे असणार आहे. आणि ही दोन्ही आव्हान बहुतांशी या यात्रेवर अवलंबून असणार आहे, असं बोललं जातंय.

महत्वाच्या बातम्या-

-नगरची जागा न सोडणं अंगलट; राष्ट्रवादीला सुरुंग लावण्यात विखेंचा मोठा वाटा

-होय… खेकडे धरण फोडू शकतात!- आदित्य ठाकरे

-अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात ‘शिवस्वराज्य’ यात्रा; उदयनराजे असणार ‘स्टार कॅम्पेनर’!

-“ओव्हरफ्लो झालेलं जहाज बुडतं हा नियम आहे… भाजपचं जहाज नक्की बुडणार”

-“तोंडातून फेस येईपर्यंत ज्यांच्यावर टीका केली… आज त्यांच्याच कळपात प्रवेश केला”