“…म्हणून नितीन गडकरींचं महत्व कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न”

नवी दिल्ली | भाजपच्या सुधारीत राष्ट्रीय कार्यकारणीची यादी जाहीर करण्यात आली. भाजप संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या पनर्रचनेत पक्षाने दोन नवीन चेहरे घेतले आणि काही जुन्या आणि वरिष्ठ नेत्यांना वगळले.

भाजपच्या संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीमधून नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना वगळण्यात आले. आणि देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय निवडणूक समीतीत घेतले आहे.

नितीन गडकरी यांच्या वगळलेल्या नावामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाने (NCP) नितीन गडकरींच्या वगळलेल्या नावावर भाष्य केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने भाजपवर टीका केली आहे. गडकरींची राजकीय उंची वाढत असल्याचे हे चिन्ह आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी म्हंटले आहे, याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.

नितीन गडकरींचा भाजपच्या संसदीय मंडळात समावेश न करण्याचे कारण गडकरी एक चतुर राजकारणी म्हणून त्यांचा उंचावत चाललेला दर्जा आणि वाढती लोकप्रियता हे आहे, असे क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजपवर देखील टीका केली. जेव्हा तुमच्या क्षमता आणि कौशल्ये वाढतात आणि जेव्हा तुम्ही नेतृत्वासमोर आव्हाने ठेवता, तेव्हा भाजप तुम्हाला घरी बसविण्याचा आणि तुमचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न करतो.

भाजपच्या केंद्रीय मंडळ आणि निवडणूक समितीची रचना करताना नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chuhan) यांना वगळण्यात आले आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पक्षाने केंद्रात खेचले आहे. आता फडणवीस केंद्राच्या राजकारणात जाणार आहेत. गडकरींना वगळून त्यांना पुढे घेतल्याने आता भाजपच्या आगामी रणनितीची चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; घेतला ‘हा’ निर्णय

देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात? भाजपने दिली मोठी जबाबदारी

काँग्रेसचे ‘हे’ बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

“महिलेचे कपडे उत्तेजक असतील आणि लैगिक छळ झाला, तर…” – न्यायालय

दरवाजे अद्यापही खुले आहेत, पण… आदित्य ठाकरेंची बंडखोरांना अट