बीड | परळी विधानसभा मतदारसंघातून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची उमेदवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केली आहे. आज शरद पवार बीड दौऱ्यावर आहेत. त्यांनी बीडमध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे हे परळीचे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असं जाहीर केलं आहे. याअगोदर देखील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी धनंजय मुंडेंची उमेदवारी जाहीर केली होती.
परळीमधून भाजपकडून मंत्री पंकजा मुंडे असणार आहेत, हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात भावा-बहिणीची आरपारची लढाई पाहायला मिळणार, हे नक्की झालं आहे.
बीडमध्ये आणि परळीमध्ये मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडेंच्या फेऱ्या वाढल्या आहेत. मागच्या वेळी लेकीला आशीर्वाद दिला आता यंदाच्या वेळी लेकाला आशीर्वाद द्या… आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या, अशी साद गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे परळीकरांना घालत आहेत.
विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आहे. मागील काही दिवसांपासून परळी मतदारसंघातील माहोल गरम झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या घरोघरी जात आहेत आणि जनसामान्यांच्या अडचणी समजावून घेत आहे. तर पंकजा यादेखील मतदारांशी संवाद साधण्यात आघाडीवर आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच परळीत बोलताना तुम्हाला मी शब्द देतो की जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत परळीचा विकास करत राहील, असं आश्वासन धनंजय मुंडे यांनी परळीकरांना दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
महाजनादेश यात्रा चंद्रकांत पाटलांच्या कोल्हापुरात; रस्त्यावर मात्र शुकशुकाट https://t.co/yRR9bn5jhq @ChDadaPatil #MahaJanadeshYatra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019
राणा पाटलांचा भाजपप्रवेश हा त्यांच्या पत्नीच्या प्रेमापोटी झालाय; धनंजय मुंडेंची टीका https://t.co/JlHvd2cxdF @dhananjay_munde
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019
अन्यथा मी तुमचं पितळ उघडं पडतो…. ; धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज! https://t.co/6guLVXChhi @dhananjay_munde @Dev_Fadnavis #Nanar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019