मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली राज्यातील व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी काही महत्त्वाच्या विषयावर सूचना केल्या तसंच अशा परिस्थितीमध्ये लोकांमध्ये विश्वास निर्माण करा आणि त्यासाठी मंत्री आणि अधिकाऱ्यांना कामाला लावा, असा कानमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची चौथ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. यावेळी दररोज ठराविक वेळ निश्चित करून शासनाने आवश्यक सवलतींची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी. दुकाने, कार्यालये, खाजगी क्षेत्रातील आस्थापने टप्प्याटप्प्याने उघडली जातील, अशी प्रमुख सूचना पवारांनी केली.
लॉकडाऊनच्या काळआत लोकांमध्ये प्रचंड मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. तो संभ्रम दूर करण्यासाठी मंत्री आणि अधिकाऱ्यांना कामाला लावा. तसंच परिस्थिती नियंत्रणात येत असताना लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची देखील गरज आहे. म्हणून आता मंत्र्यांची उपस्थिती वाढणे आवश्यक असल्याचं पवार म्हणाले.
कोरोना आपल्यातून लगेच जाणार नाही. आपल्याला त्याच्यासोबत जगण्याची सवय करून घ्यावी लागणार आहे, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘खोटं बोलू नका’; काँग्रेसच्या त्या ट्विटवर अनुपम खेर संतापले
-लॉकडाउनचा नियम मोडला; ‘या’ भाजप आमदारावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल
-“बिरोबाच्या शपथेचं मी अन् बिरोबा बघून घेऊ; पवारांच्या बगलबच्च्यांनी मला सांगू नये”
-…पण तरीही भाजप नेत्यांना फक्त राज्यपालच दिसतात- बाळासाहेब थोरात