शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज्य यात्रे’स सुरुवात

पुणे : किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवरायांच्या चरणी राष्ट्रवादीचे नेते नतमस्तक झाले आहेत. यासह राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेस सुरुवात झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून ही यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेत जनसामान्यांपर्यंत जाऊन राष्ट्रवादीचे नेते संवाद साधणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली आहे, तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रा काढली आहे.

राष्ट्रवादीने त्यानंतर आपल्या शिवस्वराज्य यात्रेची घोषणा केली होती. अखेर आजपासून किल्ले शिवनेरीहून या यात्रेला सुरुवात झाली असून, 28 ऑगस्ट रोजी रायगडावर ही यात्रा समाप्त होणार आहे.

नव्या स्वराज्याचा नवा लढा, असं घोषवाक्य या यात्रेला राष्ट्रवादीकडून देण्यात आलं आहे.

शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने ही यात्रा काढली आहे. तर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले या यात्रेचे स्टार प्रचारक असणार आहेत. 

शिवस्वराज्य यात्रेच्या शुभारंभाचे निवडक क्षण-

किल्ले शिवनेरीवर शिवस्वराज्य यात्रेच्या शुभारंभाला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. किल्ल्यात प्रवेश करताना ते प्रवेशद्वारावरच नतमस्तक झाले. 

Shivswarajya Yatra 1

 

धनंजय मुंडे आणि अमोल कोल्हे यांच्यासह निवडक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Shivswarajya Yatra 2

किल्ले शिवनेरीवरील आई शिवाईच्या मंदिरात जाऊन दोन्ही नेत्यांनी देवीची विधीवत पूजा केली. आणि आशीर्वाद घेतले. तसेच शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक घालून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात झाल्याची घोषणा केली.  

Shivswarajya Yatra 3

शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर किल्ले शिवनेरीवर एकच घोषणाबाजी करण्यात आली. पाहा व्हीडिओ-

 

महत्वाच्या बातम्या-

-“सचिन पायलट किंवा ज्योतिरादित्यांना काँग्रेसचे अध्यक्ष करा”

-“जम्मू काश्मीरचा करार पंडित नेहरुंनी केला, सरदार पटेलांनी नाही”

-काँग्रेसला मोठा धक्का; राज्यसभेतील ‘या’ महत्वाच्या नेत्याचा राजीनामा

-अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयातच सहा शेतकऱ्यांनी केलं विष प्राशन

-जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवलं तर काय होईल???