“देवेंद्र फडणवीस असते तर महाराष्ट्रात आज गावोगावी तिरड्या उठल्या असत्या”

मुंबई | कोरोनाचं वादळ महाराष्ट्रात घोंघावत असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर आज गावोगावी तिरड्या उठल्या असत्या, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केली आहे. त्यांनी ट्वीट करून भाजप भाजपवर निशाणा साधला आहे.

सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज आहे, असं ट्वीट भाजप नेते निरंजन डावखरे यांनी केलं आहे. त्यांच्या याच टीकेला सुरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने आतापर्यंत अतिशय व्यवस्थित परिस्थिती हाताळली आहे. नेटकऱ्यांकडून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचं यासाठी कौतुक देखील होतंय. पण विरोधी पक्ष असलेल्या भाजपला मात्र राज्य शासन कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरतंय, असं वाटतंय.

दरम्यान, काल (बुधवारी) रात्रीपासून सोशल मीडियावर #NeedForDevendra नावाचा ट्रेंड होऊ लागला आहे. देवेंद्र फडणवीसांनी कोरोनाची परिस्थिती उद्धव ठाकरेंपेक्षा चांगली हाताळली असती, असं ट्वीटकर्त्यांना या ट्रेंडच्या माध्यमातून सांगायचं आहे. मात्र राष्ट्रवादीने आज भाजपच्या नेत्यांना आणि भाजपच्या पाठीराख्यांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-मेडिकल यंत्रणा जवानांप्रमाणे लढतेय, त्यांच्यावर ताण आणू नका- मुख्यमंत्री

-राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या 49वर; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

-बायकोला न सांगता मैत्रीणीला घेऊन इटलीला फिरायला गेला अन् कोरोना घेऊन परत आला

-“आपण जागतिक यु्द्ध लढत आहेत, घाबरून युद्ध जिकलं जात नाही”

-चिकन, मटन खाल्ल्याने कोरोना होत नाही- शरद पवार