पुणे महाराष्ट्र

पडझड रोखण्यासाठी राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांना दिली शपथ!

पुणे |  राष्ट्रवादीची पडझड रोखण्यासाठी पक्षाने एक नामी शक्कल लढवली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवारांची साथ सोडणार नाही, अशी शपथ राष्ट्रवादीने युवा कार्यकर्त्यांना दिली आहे.

राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी पुण्यात एका आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांना शपथ दिली. यावेळी पार्थ पवार देखील उपस्थित होते.

राष्ट्रवादीने पुढील शब्दात कार्यकर्त्यांना दिली शपथ-

मी आज शपथ घेतो की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा क्रियाशील कार्यकर्ता आहे. आदरणीय श्री शरदराव पवार यांनी स्वाभिमानातून स्थापण केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विचारांशी माझी बांधिलकी आहे. गेली 55 वर्ष राजकारणात ज्यांनी आपला ठसा निर्माण केला, अशा पवार साहेबांच्या कठीण काळात त्यांना साथ देणं, मी माझे प्रथम कर्तव्य समजतो. आणि त्यासाठी पडेल ते कष्ट घेण्यासाठी मी सदैव तत्पर राहिल. माझ्या शरीरात जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मी पवार साहेबांची साथ सोडणार नाही… जय राष्ट्रवादी!

गेल्या काही दिवस राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणावर आऊटगोईंग चालू आहे. एकेकाळचे पवारांचे विश्वासू सहकारी त्यांची साथ सोडून जात आहे. सचिन अहिर, मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलीये.

राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेशी संवाद साधण्याकरिता ‘शिवस्वराज्य’ यात्रेचं आयोजन केलं आहे. शिवस्वराज्य यात्रेची धुरा खासदार अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज आणि राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले स्टार कॅम्पेनर म्हणून या यात्रेत सहभागी होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-जितेंद्र आव्हाडांच्या बोचऱ्या टीकेला शिवेंद्रराजेंचं खरमरीत प्रत्युत्तर!

-“शरद पवार हृदयात आहेत असं म्हणणाऱ्यांचं हृदय मला चेक करावं लागेल”

-शरद पवारांनी माझं सरकार पाडलं, सर्वांना त्रास दिल्यानेच आज त्यांची अवस्था अशी!

-नेते सोडून गेले म्हणून राष्ट्रवादीने फोडले फटाके!

-ज्युनिअर आर. आर. पाटील म्हणतात; वेळ बदलते म्हणून ‘घड्याळ’ थांबत नाही…!

IMPIMP