मुंबई | राष्ट्रवादीला सोबत घेतल्याशिवाय काँग्रेसला सत्तेचा गुलाल लागूच शकत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीने काँग्रेसला डिवचलं आहे, तर शिवसेनेनेही ‘दो से भले तीन’ हे काँग्रेसने समजून घ्यावं, असा टोमणा मारला आहे.
तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द होताच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. तर पाच राज्यांंच्या निकालात मात मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल खचले असून, राष्ट्रवादी व शिवसेनेला काँग्रेसची कोंडी करण्याची आयती संधी मिळाली आहे.
राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे म्हणाले, पाच राज्यांचे निकाल पाहता काँग्रेसला ग्राफ घसरलेला दिसतो. त्यामुळे राष्ट्रवादीला कमजोर समजण्याची चूक काँग्रेसने करू नये.
तसेच तीन सदस्यीय प्रभागात राष्ट्रवादीची ताकद काहीशी कमी पडली असती. मात्र, आता प्रभागाचा आकार लहान झाला तर राष्ट्रवादी अधिक भक्कम होईल व काँग्रेसची मनधरणी करण्याची गरज पडणार नाही. राष्ट्रवादीकडे गमविण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे आता विचार काँग्रेसला करायचा आहे, असा इशारा त्यांनी दिला.
तीनही पक्षांनी एकत्र लढायला हवं, अशीच आमची भूमिका आहे. मात्र, काँग्रेसकडून कधीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. एकत्र नाही लढले तर काँग्रेसचंच जास्त नुकसान होईल, असं शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ, चीनने घेतला आणखी एक मोठा निर्णय’
अनिल परब यांचा पाय आणखी खोलात; धक्कादायक माहिती समोर
‘इस्लाम धर्म हाच खरा हिंदुस्थानचा शत्रू’; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
मोठी बातमी! शिवसेनेचा मोठा नेता आयकर विभागाच्या रडावर
नवाब मलिकांचा राजीनामा घेणार?, जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं…