नवी दिल्ली | लोकसभेत अनेक राजकीय पक्षांचा मोदी त्सुनामीपुढे सुफडासाफ झाला. त्यातून हे पक्ष सावरत नाहीत तोच निवडणूक आयोगाकडूनही या पक्षांना दणका बसण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्याची नोटीस पाठवली आहे. आयोगाने यासंबंधीची नोटीस आज राष्ट्रवादीला दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आयोगाने दिलेल्या नोटिसीला 20 दिवसांत उत्तर द्यायचे आहेत. उत्तर न दिल्यास राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात येऊ शकतो, असं आयोगाने म्हटलंय.
राष्ट्रवादीसोबतच तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनाही निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे. त्यांनाही उत्तर देण्यास आयोगाने 20 दिवसांची मुदत दिली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला महाराष्ट्रात 4 जागांवर तर देशात एका जागेवर समाधान मानावे लागले. निवडणूक आयोगाने देशात 7 पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिलेला आहे.
महत्वाच्या बातम्या-