मुंबई | अवकाळी पावसाने राज्यातला शेतकरी उध्वस्त झालाय. चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वत्र नुकसान झालंय. हातचं पीक गेलंय. कर्जाचा डोंगर वाढतोय. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला मदतीची आवश्यकता आहे. 12 डिसेंबरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस असतो. त्यांच्या वाढदिवसादिनी आपण बळीराजाला मदत करायला हवी, असं आवाहन राष्ट्रवादीने आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना केलं आहे.
सरकार काय द्यायची ती मदत देईल… पण आपण शरद पवार साहेबांचे सच्चे कार्यकर्ते आहोत. आज सगळा शेतकरी वर्ग साहेबांकडे आशेने बघतो आहे. साहेबच यातून काहीतरी मार्ग काढतील, असा विश्वास त्यांना आहे. त्यांच्या याच विश्वासाला आपण पात्र राहूयात, असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
बळीराजाला मदत करण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने खारीचा वाटा उचलायला हवा… आपण त्यासाठी निधी जमा करूया आणि तो निधी साहेबांकडे सुपूर्द करूया, असं राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ट्वीट केलं आहे.
दरम्यान, माझ्या वाढदिवसाला कार्यक्रमांची रेलचेल असू नये. तर बळीराजाला आधार देण्याचा प्रयत्न असावा, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
चला सोबत करूया संकटात सापडलेल्या बळीराजाला…
आदरणीय पवार साहेबांसोबत आपली ताकद उभी करूया. आपल्यापैकी प्रत्येकजणाकडून खारीचा वाटा उचलूया…
पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १२ डिसेंबर रोजी आपण बळीराजाच्या मदतीसाठी संकल्प करूया..@PawarSpeaks #Maharashtra pic.twitter.com/9a16FZoY3P
— NCP (@NCPspeaks) December 2, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
केंद्राचे 40 हजार कोटी वाचवले हेगडे यांचा दावा शंभर टक्के खोटा- देवेंद्र फडणवीस- https://t.co/9wMo5d6W8n @Dev_Fadnavis @BJP4India @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
…तर पंतप्रधान मोदींना राजीनामा द्यावा लागेल- नवाब मलिक – https://t.co/S0NUOF6Qi7 @nawabmalikncp @narendramodi @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
…तर पंतप्रधान मोदींना राजीनामा द्यावा लागेल- नवाब मलिक – https://t.co/S0NUOF6Qi7 @nawabmalikncp @narendramodi @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019