Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

शरद पवारांच्या ‘सिल्वर ओक’वर आंदोलन करणाऱ्यांना राष्ट्रवादीचा थेट इशारा!

sharad pawar 1 e1649421826721

मुंबई | काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजेच सिल्वर ओकवर मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं. एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत शरद पवारांच्या घरात घुसून चप्पल फेक केली.

अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची देखील तारंबळ उडाली. शरद पवार हाय हाय… अशा घोषणा देत आंदोलकांनी घेराव घातला. त्यानंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी पोहोचल्या.

सुप्रिया सुळेंना पाहून त्यांना देखील घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना वाट मोकळी करून दिली. त्यावेळी सुप्रिया सुळेंनी आंदोलकांना शांत राहण्याची हात जोडून विनंती केली.

आंदोलकांनी थेट भूमिका घेतल्याने आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सिल्वर ओककडे धाव घेतली आहे. त्याचबरोबर अनेकांनी वेगवेगळ्या माध्यमातून या घटनेचा निषेध देखील व्यक्त केला आहे.

अशातच आता मुंबई राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीकास्त्र सोडलं. सदावर्ते यांनीच कर्मचाऱ्यांना भडकवलं, असं नरेंद्र राणे म्हणाले.

सरकारशी बोलणी चालू होती. प्रकरण न्यायालयात आहे. कर्मचाऱ्यांना बोलण्याची संधी दिली होती. मात्र, अशा प्रकारचा हल्ला खपवून घेतला जाणार नाही, असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘सिल्वर ओक’वर राडा! सुप्रिया सुळे हात जोडत म्हणाल्या, “माझी आई आणि मुलगी घरात…”

ST कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा; शरद पवारांच्या सिल्वर ओकवर चप्पल फेक

राज ठाकरेंच्या कारवाईनंतर वसंत मोरेंना अश्रू अनावर, म्हणाले…

“दादा, कुछ तो गडबड है…”; चंद्रकांत पाटलांचा मोठा खुलासा

‘राज ठाकरे यांना अटक करा’; अबू आझमी यांची मागणी