“राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात नंबर 1 चा पक्ष बनेल”

मुंबई | राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राधानगरी आणि भुदरगड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मुळापासून पक्ष बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा निघाली आहे. पक्ष जर बुथ स्तरावर मजबूत असेल तर पक्षाची संघटना प्रचंड बळकट होईल. आपल्याला येत्या काळात हे काम करायला हवे, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

महाविकास आघाडी सरकार आल्यापासून या भागाचे अनेक प्रश्न आपण सोडवले आहेत. पण या कामाचा प्रचार होण्यासाठी बुथ कमिट्या सक्षम कराव्यात. हे जर झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात एक नंबरचा पक्ष बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मागील विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात के.पी.पाटील यांचा पराभव झाला. हा पराभव डोक्यातून काढून टाकून पुढच्या निवडणुकीच्या तयारीसाठी लागावं, असे आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

दरम्यान, संत बाळूमामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या परिसरात अतिशय भक्तीमय वातावरणात सभा पार पडत आहे, याचा आनंद आहे. मनात सत्याची भावना ठेवत आपले मनोगत व्यक्त करतो, असे जयंत पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या – 

भर सभेत अजित पवारांच्या वक्तव्यानं लोकांना हसू आवरेना, म्हणाले…

“बदाम खाऊन मला अक्कल आली की…”; अभिनेता अमेय वाघची पोस्ट चर्चेत

“शरद पवार भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले, हकालपट्टी झाल्यावर…”

ही दोस्ती तुटायची नाय! LIVE सामन्यात पोलार्डने घेतलं ड्वेन ब्राव्होचं चुंबन; पाहा व्हिडीओ

“पोलिसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नोटीस पाठवावी”