महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड

मुंबई : राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षाची साथ सोडत असताना महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील पक्षाला रामराम केला. आता त्यांच्या जागी रुपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चाकणकर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण उपस्थित होत्या. 

चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचं महिला संघटन करण्याचं चांगलं काम केलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्या बॅकफूटवर गेल्या होत्या. त्यातच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. 

नुकताच त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला. आपल्याला ही संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचे सर्वोसर्वा शरद पवार यांचे आभार देखील मानले. 

दरम्यान, एकाकी पक्ष सोडून गेलेल्या चित्रा वाघ यांच्याजागी महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कोणाच्या हाती द्यावी, असा प्रश्न निर्माण झाला होता. बीडच्या नेत्या रेखा फड आणि पुण्यातील रुपाली चाकणकर यांची नावं चर्चेत होती.

राष्ट्रवादी काँग्रेसने या पदासाठी रुपाली चाकणकर यांच्यावर विश्वास टाकला आहे. त्या पुणे शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष राहिल्या आहेत. शहरातील महिला संघटन वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

रुपाली चाकणकर यांचं शहराध्यक्षपद नुकतंच काढून घेण्यात आलं होतं, मात्र आता राष्ट्रवादीने त्यांना थेट राज्याचं महिला संघटन सांभाळण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी दिली आहे.  

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते म्हणतात वंचितबरोबर चर्चा सुरू; प्रकाश आंबेडकर म्हणतात…

-…भाजपवाल्यांनो हे फार काळ टिकणार नाही- सुशीलकुमार शिंदे

-कर्नाटकातील राजकीय नाट्याला वेगळं वळण; ‘हा’ पक्ष देणार भाजपला पाठिंबा???

-चित्रा वाघ यांनी राजीनाम्याचं ट्वीट केलं अन् लोकं म्हणाले; ‘ताई तुम्हीसुद्धा…!’

-एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये येतील; ‘या’ नेत्याचा दावा!