पुणे महाराष्ट्र

‘होय, मी शरद पवार साहेबांच्या सोबत आहे…; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सोशल मीडियावर मोहीम

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. यात राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्याकर्त्यांनी सोशल मीडियावर एक मोहीम सुरु करत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे.

‘होय मी शरद पवार साहेबांच्या सोबत आहे..’ असा हॅशटॅग वापरुन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही मोहीम सुरु केली आहे. कार्यकर्त्यांनी स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर करत मी पवार साहेबांच्या सोबत आहे, अश्या पोस्ट शेअर केल्या आहेत. यातून कार्यकर्ते पक्षासोबत असल्याचं चित्र सोशल मीडियावर दिसत आहे. 

‘गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे’ अशी टॅगलाईन वापरुन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची साथ सोडत पक्षांतर केलेल्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्षाला राम राम ठोकत भाजप- शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला मोठ्या धक्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात अनेक सामान्य कार्यकर्ते मात्र पक्ष आणि पवारांच्या सोबत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी काळात आणखी मोठे धक्के बसण्याची शक्यता असून अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-या 20 दिग्गज नेत्यांनी पवारांची साथ सोडली तर हे 9 जण धक्का देण्याच्या तयारीत!

-महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड

-काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते म्हणतात वंचितबरोबर चर्चा सुरू; प्रकाश आंबेडकर म्हणतात…

-…भाजपवाल्यांनो हे फार काळ टिकणार नाही- सुशीलकुमार शिंदे

-कर्नाटकातील राजकीय नाट्याला वेगळं वळण; ‘हा’ पक्ष देणार भाजपला पाठिंबा???

IMPIMP