शोलेचा डायलॉग बदलून आता म्हणावं लागतंय ‘जो डर गया वो भाजप में गया’!

पुणे | काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातून मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश होत आहेत. मात्र विरोधी पक्षातल्या नेत्यांना चौकशीची भिती दाखवून भाजप नेते फोडत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. आज पवारांचीच री ओढच मिश्किल पद्धतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी यावर भाष्य केलं.

आजच्या पक्षांतराच्या परिस्थितीत मेहबूब शेख यांना शोले चित्रपट आठवला. अन् मग त्यांनी आपल्या भाषणात शोले चित्रपटातला डायलॉग उपस्थितांसमोर विनोदी पद्धतीने मांडला. ‘जो डर गया वो मर गया’ असा ‘शोले’ चित्रपटातला डायलॉग होता. मात्र आजची परिस्थिती पाहता तो डायलॉग बदलून आता ‘जो डर गया वो भाजप में गया’! अशी म्हणण्याची वेळ आलीये, असं मेहबूब शेख म्हणाले.

पुणे जिल्ह्यातल्या मावळमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी मेहबूब यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे आणि सुरज चव्हाण यांनीही सरकारवर तोफ डागली.

राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत असले तरी आम्ही मात्र कायम साहेबांच्या विचारांसाठी वाहून घेऊ आणि पवार साहेबांच्या सोबत असू, असा निर्धार राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, विरोधी पक्षातल्या नेत्यांना ईडी आणि इनकमटॅक्स डिपार्टमेंटची भिती दाखवून पक्षांतरं करण्यासाठी भाजप भाग पाडत आहे, असा गंभीर आरोप स्वत: शरद पवार यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साताऱ्याच्या गडानंतर सोलापूरचा बुरूज ढासळणार??

-अन् मुस्लिम महिलांना न्याय देणारं ‘तीन तलाक’ विधेयक राज्यसभेत मंजूर!

-छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार??? उद्धव ठाकरे म्हणतात…

-इस्रोच्या एकावर एक यशस्वी मोहिमा अन् केंद्र सरकार करतंय शास्त्रज्ञांच्या पगारात कपात!

-धनगर समाजासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा!